पुणे जिल्हा | केळगावात बैलगाडा शर्यती, कुस्तीचा आखाडा
Updated On:

चिंबळी, (वार्ताह) – केळगाव (ता.खेड) रघुनाथ महाराजांच्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यती आणि कुस्तीचा आखाडा रंगला होता.
उत्सवानिमित्त केळगाव व हनुमानवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि. 1) पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील भाविकांनी मोठ्या संख्यने दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी (दि. 2) पहाटे मंदिरात काकड आरती महापूजा, अभिषेक करून सकाळी 9 वा माडंव डहाळे, हारतुरे, मिरवणुकीनंतर बैलगाडा शर्यती रंगल्या होत्या.
या शर्यतीत 260 बैल गाड्यांनी सहभाग घेतला होता. तर करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा व ऑकेस्ट्रॉचा कार्यक्रम रंगला होता. बुधवारी (दि. 3) दुपारी 4 वाजता कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.




