आजपासून सुरु होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ‘ही’ 16 महत्त्वाची विधेयके मांडली जाणार

Budget Session 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरु होणार आहे. तर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन टप्प्यात पार पडेल. पहिला टप्पातील कामकाज 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत असेल. अधिवेशनाच्या 64 दिवसांच्या कालावधीत एकूण 27 बैठकांचे ( पहिल्या टप्प्यात 9 बैठका आणि दुसऱ्या टप्प्यात 18 बैठका) आयोजन करण्यात येणार आहे. अधिवेशनादरम्यान जवळपास 16 विधेयकं मांडली जाणार आहेत.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 संदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मंत्र्यांसहित 36 राजकीय पक्षांचे एकूण 52 नेते उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 16 विधेयके मांडली जाण्याची शक्यता
- बँकिंग कायदे ( सुधारणा) विधेयक, 2024
- रेल्वे (सुधारणा) विधेयक, 2024
- आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024
- तेलक्षेत्र(नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, 2024
- बॉयलर विधेयक, 2024
- गोव्याच्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक, 2024
- वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024
- मुसलमान वक्फ (रद्दबातल) विधेयक, 2024
- बिल्स ऑफ लेडिंग (जहाजावर मालभारण )विधेयक, 2024
- समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक, 2024
- किनारपट्टी नौवहन विधेयक, 2024
- मर्चंट शिपिंग विधेयक, 2024
- वित्त विधेयक, 2025
- हवाई वाहनांमधील हितसंबधांचे संरक्षण विधेयक, 2025
- त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, 2025
- स्थलांतर आणि परदेशी व्यक्ती विधेयक, 2025





