राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार ; मुंबई, पुण्यातील मार्गांचाही समावेश

Maharashtra Budget 2025 । उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भातील घोषणांकडे सर्वांचे लागले असताना अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘या’ मार्गावर मेट्रो काम सुरु होणार Maharashtra Budget 2025 ।
* उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
* पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे
* तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे
* या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
* महानगरातील प्रवाशांना वातानुकुलित प्रवाससाठी मेट्रोचे प्रकल्प कार्यान्वित, मुंबई पुण्यात 64 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होतील. पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग तयार करणार
* नागपूर मेट्रोचा पहिला 40 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
* मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळाला जोडणारी मेट्रो सेवा निर्माण करणार
* नवी मंबईतील विमान तळाचं काम 85 टक्के काम पूर्ण, देशांतर्गत विमानसेवा सुरु आहे.
* नागपूरच्या विमानतळाचा खासगी सहभगातून विकास Maharashtra Budget 2025 ।
हेही वाचा
अर्थसंकल्पात मोठी घोषणा, मुंबईतील ‘या’ 7 ठिकाणी उभारली जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे





