लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले का? मार्च महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते.
मात्र दोन महिन्याचे हप्ते मिळणार असे सांगितले जात असतानाच खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यातच आता 12 मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात
काही दिवसांपूर्वीच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे ७ ते १२ मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचाही हप्ता दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले होते. Ladki Bahin Yojana |
ट्वीट करत त्यांनी लिहिले होते की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे !’ त्यानुसार आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. Ladki Bahin Yojana |
2100 रुपयांसाठी प्रतिक्षा करावी लागणार…
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असे म्हटले होते. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात याबाबत काही घोषणा होण्याची शक्यता होती. Ladki Bahin Yojana |
मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :
छोट्या पडद्यावरील ‘या’ दोन लोकप्रिय मालिका होणार बंद, ‘झी मराठी’ने केली नवीन शो ची घोषणा





