Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, मानसिक आरोग्य सुधारणा हा यावेळचा विशेष फोकस ठरला आहे. देशात मानसिक आरोग्यासाठी समर्पित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांची कमतरता असल्याचं अर्थमंत्र्यांनी मान्य केलं. ही उणीव भरून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलत उत्तर भारतात ‘निमहांस-2’ (NIMHANS-2) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सध्या देशातील सर्वात प्रतिष्ठित मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स संस्था निमहांस, बेंगळुरू येथे आहे. mental healthcare उत्तर भारतात निमहांस-2 अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, उत्तर भारतात मानसिक आरोग्य सेवांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था नाही. त्यामुळे तिथे निमहांस-2 उभारण्यात येणार आहे. मात्र, ही संस्था नेमकी कुठे असेल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. रांची आणि तेजपूर संस्थांचे अपग्रेडेशन यासोबतच रांची आणि तेजपूर येथील मानसिक आरोग्य संस्थांना प्रादेशिक दर्जाचे सर्वोच्च केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे. रांचीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री तेजपूरमधील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या ठिकाणी गंभीर मानसिक आजारांचे उपचार, ट्रॉमा मॅनेजमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मनोचिकित्सा, मानसशास्त्र व न्यूरोसायन्स क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन केलं जाणार आहे. मानसिक आरोग्याची वाढती समस्या अलीकडे सादर झालेल्या इकॉनॉमिक सर्व्हे 2026 मध्ये मानसिक आरोग्य ही भारतासाठी मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेषतः 15 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन वाढत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अभ्यासांनुसार, चिंता (Anxiety) नैराश्य (Depression) कमी आत्मविश्वास सायबर बुलिंगमुळे होणारा ताण यामध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. स्क्रीन टाइम वाढल्याने झोप, अभ्यास, कामाची उत्पादकता आणि सामाजिक नातेसंबंधांवरही परिणाम होत आहे. Depression तज्ज्ञांचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, देशात सायकेट्रिस्ट आणि मानसिक आरोग्य रुग्णालयांची कमतरता आहे. ही दरी भरून काढण्यासाठी सरकारने उचललेलं पाऊल तज्ज्ञांच्या मते अत्यंत आवश्यक आणि सकारात्मक आहे. एकूणच, बजेट 2026 मधील या घोषणा देशातील मानसिक आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.