Diamond League 2024 Final :- राष्ट्रीय विक्रमधारक असलेला 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळेने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरीसह नववे स्थान मिळविले. साबळेने पहिल्यांदाच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने 10 खेळाडूंच्या शर्यतीमध्ये 8 मिनिट 17 सेकंद वेळ नोंदविली.
Avinash Sable finishes 9th in Men’s 3000m Steeplechase in Diamond League Final 💎
Well Played Avinash on first ever DL Final 👏 pic.twitter.com/a4S5YS1J56
— The Khel India (@TheKhelIndia) September 13, 2024
केनियाच्या आमोस सेरेम 8 मिनिटे 06.90 सेकंदांच्या वेळेसह स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कालीने (8 मिनिटे 08.60 सेकंद) दुसरे तर ट्युनिशियाच्या मोहम्मद अमीन झिनौईने 8 मिनिटे 09.68 सेकंदांसह तिसरे स्थान मिळविले.
साबळेने या मोसमात डायमंड लीगच्या दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि तीन गुणांसह गुणतालिकेत 14व्या स्थानावर होता. त्याच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या चार खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता.