Avinash Sable : अविनाश साबळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३६ वर्षांनंतर स्टीपलचेसमध्ये रचला इतिहास

८ मिनिटे १०.१३ सेकंदात पूर्ण केली शर्यत –
अविनाश साबळेने ८ मिनिटे १०.१३ सेकंदात शर्यत पूर्ण करत राष्ट्रीय विक्रमाला पुन्हा एकदा गवसणी घातली. ही त्याची दहावी वेळ आहे, जेव्हा त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला. अविनाशचा हा विजय केवळ त्याच्या क्रीडा कौशल्याचाच नव्हे, तर त्याच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा पुरावा आहे. मांडवा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशने लहानपणापासून अनेक अडचणींचा सामना केला.
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने सुवर्णपदक जिंकले 🔥🇮🇳
अविनाशने ८:२०.९२ वेळ नोंदवली. शेवटच्या लॅप मध्ये जपानच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत तब्बल ३६ वर्षानंतर अविनाशने भारताला स्टीपलचेस मध्ये आशियात सर्वोत्तम ठरवले.#AvinashSable #KJvideopic.twitter.com/pMtUmt0qKn— क्रीडाजगत (@kreedajagat) May 29, 2025
𝐀𝐯𝐢𝐧𝐚𝐬𝐡 𝐒𝐚𝐛𝐥𝐞 𝐂𝐥𝐚𝐢𝐦𝐬 𝐆𝐨𝐥𝐝 🚨
In a statement race, Indian NR holder Steeplechaser #AvinashSable grabs Gold Medal
💥 India’s Third Gold
💥 Sable had a silver in 2019First Gold in Steeplechase in 36 years in Male SC for India at Asian Athletics… pic.twitter.com/cz9i6aVRwa
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) May 29, 2025
शाळेत जाण्यासाठी दररोज ६ किलोमीटर धावणे, वीट भट्टीवर काम करणे आणि भारतीय सैन्यात सामील होऊन सियाचीनसारख्या कठीण ठिकाणी सेवा देणे, या सर्व अनुभवांनी त्याला घडवले. त्याच्या या यशाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. गावकऱ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले, तर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
अविनाशच्या वडिलांनी, मुकुंद साबळे यांनी, मुलाच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले की, अविनाशने लहानपणापासूनच देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याच्या या कामगिरीने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील अकराव्या स्थानाच्या निराशेनंतर पुन्हा एकदा त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. हा विजय अविनाशच्या करिअरमधील मैलाचा दगड आहे. त्याच्या या यशाने भारताच्या ॲथलेटिक्स क्षेत्रात नवीन आशा निर्माण झाल्या असून, पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत तो देशाला पदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.





