Paris Diamond League 2024 : अविनाश साबळेने मोडित काढला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम…

Paris Diamond League 2024 : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अविनाश साबळेने रविवारी डायमंड लीगमध्ये 8 मिनिटे आणि 9.91 सेकंद वेळेसह सहावे स्थान मिळवून 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने 2022 मध्ये सेट केलेल्या 8:11.20 च्या त्याच्या मागील राष्ट्रीय विक्रमात सुमारे 1.5 सेकंदांनी सुधारणा केली. त्याची ही 10वी राष्ट्रीय विक्रमी कामगिरी होती.
भारताचा मागील राष्ट्रीय विक्रम 8:11.20 असा होता, जो अविनाश साबळेने दोन वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत स्थापित केला होता.
इथिओपियाच्या अब्राहम सिम, ज्याने या वर्षीच्या पावो नुर्मी गेम्समध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याने या स्पर्धेत 8:02.36 च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह पहिले स्थान पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता केनियाच्या आमोस सेरेमनेही 8:02.36 अशी वेळ नोंदवली परंतु फोटो फिनिशमध्ये तो दुसरा क्रमांकावर राहिला.
Asian Squash Doubles Championship 2024 : भारतीय स्क्वॉशपटूअभय सिंगचा दुहेरी सुवर्ण धमाका…
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 कांस्यपदक विजेता अब्राहम किबिवोट 8:06.70 च्या वेळेसह तिसऱ्या स्थानावर राहिला, त्यानंतर ट्युनिशियाचा राष्ट्रीय विक्रम धारक मोहम्मद अमीन झिनौई (8:09.41) आणि न्यूझीलंडचा 1500 मीटर इनडोअर वर्ल्ड चॅम्पियन ज्योर्डी बेमिश (8:09.64) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले.





