ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यावर होणार शस्त्रक्रिया
Updated On:

लंडन – ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यावर पुढील आठवड्यात प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बकिंगहॅम राजवाड्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
राजे चार्ल्स यांना होत असलेला त्रास ही एक सर्वसामान्य बाब असून त्यामध्ये काहीही गंभीर नाही.दरवर्षी शेकडो पुरुषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येत असते, असेही राजवाड्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी ७४ वर्षीय राजे चार्ल्स यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यांची प्रकृती सर्वसाधारण असल्याचे समजते आहे.





