Chandrapur Bribery Case : काम होताच ५ हजारांची लाच मागितली; आरोग्य विभागाचा कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात
Chandrapur Bribery Case : कामाच्या बदल्यात तक्रारदाराकडे मागितली ५ हजार रुपयांची लाच

Chandrapur Bribery Case : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. या प्रकाराविरोधात संबंधित कर्मचार्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ब्रम्हपुरी येथे कार्यरत असलेले तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे (वय ४०) यांनी एका कर्मचाऱ्याकडून प्रोत्साहन भत्त्याचे बिल मंजूर करून दिल्याच्या बदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचत आरोपीला रंगेहाथ पकडले.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार हे आरोग्य विभागाशी संबंधित विविध कामे करणारे कर्मचारी असून त्यांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन मिळते. माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण मोहिमा, साथीचे व संसर्गजन्य आजार नियंत्रण, विविध बैठका तसेच इतर कामांबाबतचे बिल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आले होते. या कामांच्या मोबदल्याची ३३ हजार ६३१ रुपयांची रक्कम तक्रारदारांच्या पोस्ट खात्यात ९ मे २०२६ रोजी जमा झाली होती. Chandrapur Bribery Case
Pranit More: ‘370 रुपये बिर्याणी’ प्रकरणाच्या वाढत्या वादानंतर प्रणित मोरेने घेतला मोठा निर्णय; थेट…
त्यानंतर सुदेश महाडोळे यांनी संबंधित बिलाची अंतिम तपासणी करून ते पुढील स्तरावर पाठविल्यामुळेच बिल मंजूर झाले असल्याचे सांगितले. या बदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर एसीबीकडून १० जून रोजी सापळा रचत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. Chandrapur Bribery Case
हेही वाचा:





