Pranit More: ‘370 रुपये बिर्याणी’ प्रकरणाच्या वाढत्या वादानंतर प्रणित मोरेने घेतला मोठा निर्णय; थेट…
Pranit More: महिलांचा अपमान करणारी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची उसळली.

Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक प्रणित मोरे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोमध्ये केलेल्या एका प्रेक्षकाने महिलांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
त्या प्रेक्षकाने केलेल्या विधानानंतर प्रणित हसला आणि त्याने ही चेष्ठा केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. यप्रकरणी त्याला जाहीर माफीनामा त्याला प्रसिद्ध करावा लागला.
इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट
आता वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने मोठा निर्णय घेतला असून आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या शोची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी हिमांशु आणि प्रणितच्या संवादावर आक्षेप घेतला. आता या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने त्याचे मुख्य इन्स्टाग्राम अकाऊंट @rjpranit डीअॅक्टिव्हेट केल्याचे समोर आले आहे.
मात्र, त्याचं @maharashtrianbhau हे दुसरं इन्स्टाग्राम अकाऊंट अद्याप सक्रिय आहे. सोशल मीडियावर प्रणित मोरेचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर तो नियमितपणे त्याचे स्टॅंडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, सध्या त्याचं @rjpranit हे अकाउंट सोशल मीडियावर उपलब्ध नाही. सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडून केलेल्या त्या व्हिडीओमुळे प्रणित मोरेनं इस्टाग्रॅम अकाउंट बंद करून टाकलं आहे.
‘370 रुपयांच्या बिर्याणी’वरून सुरू झाला वाद नेमका काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने एका महिलेसोबत डेटसाठी बाहेर गेल्याचा अनुभव सांगितला. दोघांनी मिळून चिकन बिर्याणी खाल्ली होती, ज्यासाठी त्याने 370 रुपये खर्च केल्याचे सांगितले.
त्यानंतर संबंधित महिलेने त्याला घरी सोडण्याची विनंती केल्यावर आपण खर्च केलेल्या पैशांची वसुली करणार असं म्हणत महिलेशी शारिरीक संबंध ठेवल्याचं सांगितलं. त्याच्या वक्तव्यावर उपस्थित तरुणवर्ग टाळ्या वाजवून त्याला दाद देत होता.
आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊनही तरुण हिमांशू जांगडा बरळतच राहिला. डेट करत असलेल्या महिलेसोबत त्याने कशी जवळीक साधली, तिला कुठे स्पर्श केला असे तपशीलही तो रंगवून सांगू लागला. हा व्हिडिओ व्हायरल होताच यातील अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. नंतर मात्र या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झालं.
महिलांचा अपमान करणारी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची उसळली. अनेकांनी या विधानावर तीव्र आक्षेप घेत महिलांविषयीच्या त्याच्या दृष्टिकोनावर टीका केली. सध्या या प्रकरणाचा वाढता वाद पाहता महिलांच्या बाजूने अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
हेही वाचा:
NCRA Pune: अवकाशात दडलंय काय? पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ५ रहस्यमयी तारे; नासाही चक्रावली





