Cheteshwar Pujara (IND vs AUS) : टीम इंडियाचा दमदार फलंदाज चेतेश्वर पुजारा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. या सामन्यादरम्यान पुजारा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसू शकतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुजाराने आतापर्यंत टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. पुजाराने भारताकडून शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. जून 2023 नंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकला नाही. पुजाराकडे आता नव्या जबाबदारीसह दिसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुजारा स्टार स्पोर्ट्ससाठी हिंदी कॉमेंट्री करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुजारा हा भारताचा अनुभवी फलंदाज आहे. त्याचा कसोटीत चांगला रेकॉर्ड आहे. रोहितशिवाय मैदानात उतरणार टीम इंडिया ? टीम इंडिया पर्थ कसोटीत रोहित शर्माशिवाय मैदानात उतरू शकते. रोहित पर्थ कसोटीला मुकणार आहे. त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहितला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. ॲडलेड कसोटीतून तो मैदानात परतू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. Border-Gavaskar Trophy 2024/25 : हर्षित राणा की प्रसिद्ध कृष्णा? पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया कोणाला संधी देणार… पुजाराची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द… पुजाराने 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण सामना खेळला होता. त्याने शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला आहे. पुजाराने टीम इंडियासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 7195 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी द्विशतकही झळकावले आहे. पुजाराने कसोटीत 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 206 धावा आहे. आता पुजारा क्रिकेटनंतर कॉमेंट्री करतानाही दिसू शकतो.