Border-Gavaskar Trophy 2024/25 : बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी कांगारूंना मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू मालिकेतून ‘आऊट’…

Border-Gavaskar Trophy 2024/25 : – कांगारूंचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन मणक्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे भारताविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळू शकणार नाही. ग्रीनच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, यातून त्याला बरे होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना ग्रीनला या दुखापतीने ग्रासले होते.
यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून, यामध्ये वेगवान गोलंदाजांना मणक्यांमध्ये ताण पडणे ही सामान्य गोष्ट असली तरी ग्रीनला फ्रॅक्चरजवळ असलेल्या काही भायागात मध्ये जास्त समस्या असल्याचे म्हटले आहे. सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर चषक, श्रीलंका दौरा व चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत ग्रीन खेळण्याची शक्यता कमी आहे.
स्टीव्हन स्मिथ
ग्रीनच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी क्रमामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने या वर्षाच्या सुरुवातीला निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर ग्रीनचा समावेश संघात करण्यात आला होता. स्मिथ सलामीवीरची भूमिका बजावणार होता. मात्र तो सलामीवीर म्हणून यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे तो नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.





