India A vs Australia A Test Series : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेनंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला(अ-संघ) पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भाग घ्यायचा आहे, परंतु त्याआधी ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध भारत ‘अ’ यांच्यात दोन चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात 17 खेळाडंचा समावेश करण्यात आला आहे.
अनेक युवा खेळाडूंशिवाय वरिष्ठ खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. 25 वर्षीय नॅथन मॅकस्विनी संघाचे नेतृत्व करणार आहे. 30 वर्षीय ब्यू वेबस्टर 2016 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया अ संघात परतणार आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 मध्ये भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा स्कॉट बोलंड अ-संघात परतला आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी टॉड मर्फी आणि कोरी रोचिसिओलीसह 6 वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत ‘अ’ संघाची घोषणा केलेली नाही. भारत ‘अ’ संघाचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे दिले जाऊ शकते, असे मानले जात आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बोर्ड गायकवाड याचा कर्णधार म्हणून विचार करत आहे. त्यांच्याशिवाय रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही भारत ‘अ’ संघात संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
Introducing our Australia A four-day squad to take on India A next month at Mackay and the MCG 🔥 pic.twitter.com/GCeNMWR4R9
— Cricket Australia (@CricketAus) October 14, 2024
ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध भारत ‘अ’ : दोन सामन्यांचे वेळापत्रक
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान मॅके येथे तर दुसरा सामना 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. कसोटी मालिका चार दिवस चालणार आहे.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ : नाथन मॅकस्वीनी (कर्णधार), कॅमरून बेनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकींघम, कूपर कोनोली, ओली डेविस, मार्कस हॅरिस, सॅम कोनस्टास, नाथन मॅकएंड्रयू, माइकल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, जिमी पीरसन, जोश फिलिप , कोरी रोचिसिओली, मार्क स्टेकेटी, ब्यू वेबस्टर.