Fardeen Khan : फरदीन खानचा लाडक्या लेकीसोबत भन्नाट डान्स ! नेटकरी म्हणतात, ‘हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ…’
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर चाहत्यांकडून पसंती आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

Fardeen Khan : अभिनेता फरदीन खान लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असणारा फरदीन विविध छायाचित्रे आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. Fardeen Khan
अशातच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये तो आपल्या मुलगी डियानी इसाबेला खानसोबत नृत्य करताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर चाहत्यांकडून पसंती आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. (Fardeen Khan)
या व्हिडीओ सोबत फरदीनने एक भावूक संदेशही लिहिला आहे. मुलीसोबत घालवलेल्या या अनमोल क्षणाने तो भारावून गेला असल्याचे त्याने व्यक्त केले आहे. (Fardeen Khan)
फरदीनने लिहिले, “लोक म्हणतात की एका पित्यासाठी आपल्या मुलीसोबतचा पहिला नृत्याचा क्षण हा अत्यंत अनमोल असतो. काही दिवसांपूर्वी मला याचा खरा अर्थ उमगला.
View this post on Instagram
माझ्या लहानग्या ‘सनशाइन’ला मोठं होताना पाहून १२ वर्षे कशी गेली कळलंच नाही. पण ती आजही माझ्यासाठी लहान परीच आहे. हा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे.” (Fardeen Khan )
या व्हिडीओवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान हिने “हे खूपच गोड आहे, तुम्हा दोघांना खूप प्रेम” असे म्हटले आहे.
तर तिचा भाऊ आणि अभिनेता झायेद खान याने “अप्रतिम” अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय मनिषा कोईराला, दिया मिर्झा, बॉबी देओल आणि तारा शर्मा यांनीही हृदयाचे चिन्ह देत या व्हिडीओवर प्रेम व्यक्त केले आहे. (Fardeen Khan)
Fardeen Khan : फरदीन खानचा लाडक्या लेकीसोबत भन्नाट डान्स ! नेटकरी म्हणतात, ‘हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ…’
अभिनेता फरदीन खान हा 2000 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता असून त्याने Jungle, No Entry, Heyy Babyy आणि Fida सारख्या चित्रपटांत काम केले आहे.
आपल्या अभिनयासोबतच त्याच्या स्टाइलिश व्यक्तिमत्त्वासाठीही तो ओळखला जातो. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर आता तो पुन्हा नव्या प्रोजेक्ट्ससह पुनरागमन करत आहे.





