Bollywood News : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; कंगणाच्या चित्रपटात वर्णी
Bollywood News : 'भारत भाग्य विधाता' या सिनेमाची निर्मिती कंगना रणावतच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' या प्रोडक्शनने केली.

Bollywood News : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमुळे ईशा डे हिला नवी ओळख मिळाली. यानंतर आता ईशाला मोठे यश मिळाले आहे. ईशा डेची अभिनेत्री कंगनाच्या हिंदी सिनेमामध्ये वर्णी लागली आहे. यामुळे आता तिला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची मोठी संधी मिळाली आहे. याबाबत तिने आनंद व्यक्त करत चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
ईशाने तिच्या आगामी सिनेमाबद्दलची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ईशा डे कंगनासोबत ‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पोस्टमध्ये ईशा डेनं लिहिलं की, ‘मोठ्या पडद्यावर झळकण्याचं स्वप्न पूर्ण झालं…माझ्या पहिल्या हिंदी सिनेमाची घोषणा करताना खूप आनंद होतोय.’ तसेच ईशा डेला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bollywood News)
‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमाची निर्मिती कंगना रणावतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या प्रोडक्शनने केली असून सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन मनोज तपाडिया यांनी केलं आहे. ‘भारत भाग्य विधाता’ हा सिनेमा १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ईशा डेसोबत या सिनेमात गिरिजा ओक, स्मिता तांबे, प्रसाद ओक यांसारखे मराठी कलाकारही झळकणार आहेत. (Bollywood News)

Bollywood News : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; कंगणाच्या चित्रपटात वर्णी
ईशा डेच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर, तिला ‘गुलकंद’ या सिनेमासाठी ‘झी मराठी चित्र गौरव २०२६’चा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. यानंतर आता तिची बॉलीवूडमधील नव्या चित्रपटात कोणती भूमिका असणार? याबाबतही चाहत्यांही उत्सुकता वाढली आहे. (Bollywood News)
हेही वाचा:
SBI Strike Alert : सलग ४ दिवस राहणार बँका बंद? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची होणार गैरसोय?





