SBI Strike Alert : सलग ४ दिवस राहणार बँका बंद? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची होणार गैरसोय?
SBI Strike Alert : ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाच्या परिस्थितीत सुधारणा आणि प्रलंबित मागण्यांसाठी 25 मे आणि 26 मे 2026 रोजी संप करणार

SBI Strike Alert : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काही मागण्यांसाठी बँकेचे कर्मचारी संपावर जाणार असल्याने तब्बल चार दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाच्या परिस्थितीत सुधारणा आणि प्रलंबित मागण्यांसाठी 25 मे आणि 26 मे 2026 रोजी संप करणार असल्याचे सांगितले आहे. 2 मे 2026 रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकात, संघटनेने बँक व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवल्याचा आरोप केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांकडे दीर्घकाळापासून दुर्लक्ष केले जात आहे आणि करारांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, 25 आणि 26 मे रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपावर असेल. संप दोन दिवसांचा असेल मात्र बँकेचं कामकाच चार दिवस बंद राहणार आहे. कारण 23 मे या दिवशी चौथा शनिवार आहे तर 24 मे रोजी रविवारची सुट्टी आहे. म्हणजेच दोन दिवस सोमवारी आणि मंगळवार कर्मचारी संपावर असतील. यामुळं बँकेचं कामकाज चार दिवस ठप्प होईल.
स्टेट बँकेचे कर्मचारी संपावर का?
फेडरेशनकडून एसबीआयचे चेअरमन यांना 2 मे रोजी दिलेल्या नोटीसमध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूटस एक्ट 1947 नुसार हा संप करण्यात असल्याचं सांगितलं आहे. AISBISF नं सांगितलं की, हा संप दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी करण्यात येत आहे. कर्मचार्यांची अपुरी संख्या, नोकरीच्या अटी, भरतीचे नियम आणि पेन्शनसंदर्भातील समस्या यामुळं कर्मचारी वर्ग त्रस्त आहे. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे योग्यप्रकारे लक्ष दिलं जात नाही. आधी झालेले काही करार अद्याप लागू करण्यात आलं नाही.
ऑनलाईन सेवांवर परिणाम नाही
या संपामुळे ऑनलाइन सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ऑनलाईन सेवांवर परिणाम होणार नाही. केवळ शाखेतील कामं होऊ शकणार नाहीत. मात्र, चेक जमा करणं, रोख रक्कम जमा करणे ही काम चार दिवस बंद असतील.
हेही वाचा:






