अनन्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ईशान खट्टर करतोय ‘या’ विदेशी मॉडेलला डेट

मुंबई – अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचे ब्रेकअप झाले आहे. आता ईशान पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनन्यापासून वेगळे झाल्यानंतर या अभिनेत्याचे नाव एका मलेशियन मॉडेलशी जोडले जात आहे. दरम्यान, अभिनेत्री अनन्या पांडे आणि ईशान खट्टर अनेकदा ते पार्टी आणि हॉलिडे डेस्टिनेशन्सवर एकत्र दिसले. मात्र, आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अनन्या पांडे आणि ईशान खट्टरचा ब्रेकअप झाला आहे.
सध्या अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसतात. अनन्या आणि ईशानचे ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी आपला वेगळा मार्ग अवलंबला आहे. एकीकडे अनन्या आणि आदित्यची चर्चा होत असतानाच ईशानचे नाव मलेशियन मॉडेल चांदनी बेंज हिच्यासोबत जोडले जात आहे.
नुकताच ईशानचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो बाईक चालवताना दिसत होता. यादरम्यान दुचाकीवर त्याच्या मागे एक मुलगी बसली होती, तिने हेल्मेटने चेहरा झाकला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, चांदनी ही मलेशियातील क्वालालंपूरची आहे. सिंगापूरमधील ‘माय मदर्स स्टोरी’ या टीव्ही ड्रामाने ती लोकप्रिय झाली. मलेशियन टीव्ही मालिकांमधूनही तिने काम केले आहे. कोविड महामारीनंतर चांदनी भारतात आली. सध्या चांदनी भारतात असून मॉडेलिंग करत आहे. ती बॉलिवूडमध्ये काम करण्यास इच्छुक आहे.
याआधी ईशान अनन्याला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, दोघांनी खाली पीली हा चित्रपट केला होता. हा चित्रपट 2020 मध्ये आला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचा रोमान्स सुरू झाला होता. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे. ईशानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा शेवटचा चित्रपट ‘भूत पोलिस’ होता. आता तो लवकरच ‘पिप्पा’ चित्रपटात दिसणार आहे.






