‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री शिवाली परब झळकणार मोठ्या पडद्यावर

Shivali Parab | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवाली परबला मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात ती विनोदी नाही तर एका गंभीर भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
शिवाली परब ‘मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मंगला ही व्यक्तिरेखा शिवाली साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले असून गणरायाच्या चरणी तिने आगामी सिनेमाचे पोस्टरही रिलीज केले. या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत. एक कौलारू घर आणि कोपऱ्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे.
View this post on Instagram
मंगला नावाच्या एका गायिकेवर सूडाच्या भावनेतून अॅसिड हल्ला झाला होता, कठीण परिस्थितीशी तिने कशी झुंज दिली होती, ते या चित्रपटात पाहायला मिळेल. त्या काळी अॅसिड हल्ल्यासंबंधित कोणताही कायदा नव्हता, त्यामुळे योग्य तो न्याय न मिळाल्याने मंगलाने या परिस्थितीचा सामना कसा केला हे यात पाहायला मिळणार आहे.
‘मंगला’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची अद्यापही रिलीज डेट समोर आली नाही. एका वेगळ्या भूमिकेद्वारे शिवाली परब मोठ्या पडद्यावर येणार असल्याने चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

