मुंबई – कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. ही घटना ताजी असतानाच आता बॉलीवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला सुद्धा बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.
Mumbai’s Brihanmumbai Municipal Corporation (BMC) issued a show-cause notice to fashion designer Manish Malhotra on September 7, for allegedly making “unauthorised alterations” at his office building. BMC has sought a reply from him within seven days
— ANI (@ANI) September 10, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष मल्होत्राने त्यांच्या ऑफिसच्या इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम केलं आहे. मनीषने या इमारतीचं बांधकाम करताना काही नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळेच त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच ७ दिवसांच्या आत त्याला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
तत्पूर्वी, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. यावरून चांगलेच राजकारण पेटून उठले आहे , मात्र कंगना च्या मुंबईतील बंगल्यात जे अनाधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला दोन वर्षांपुर्वीच नोटीस दिली आहे आणि त्याच वेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम केवळ 24 तासांची नोटीस देऊन कसे पाडले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्या पार्श्वभूमीवर महापालिका सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.