Pati Patni Aur Woh Do Collection Day 1 : दमदार ओपनिंगची अपेक्षा पण… आयुष्यमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले?
Pati Patni Aur Woh Do Collection Day 1 : पती पत्नी और वो दो' या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत.

Pati Patni Aur Woh Do Collection Day 1 : अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘पती पत्नी और वो दो’ हा चित्रपट १५ मे रोजी प्रदर्शित झाला.
हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्याला पहिल्या दिवशी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली असली तरी पहिल्या दिवशीचे कमाईचे आकडे पाहता समाधनकारक कामगिरी केली आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘पती पत्नी और वो दो’ने पहिल्या दिवशी ३.८५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात एकूण ३.९७ कोटी कमावले आहेत.
यामुळे हा चित्रपट त्याच्या आधीच्या ‘पती पत्नी और वो दो’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या जवळपासही पोहचू शकलेला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.१० कोटींची कमाई केली होती. (Pati Patni Aur Woh Do Collection Day 1)
‘दो दीवाने शहर में’ने पहिल्याच दिवशी १.२५ कोटी कमावले होते. जुनैद खानच्या ‘एक दिन’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त १.१५ कोटी कमावले, तर ‘गिन्नी वेड्स सनी २’ ने फक्त ३० लाखांची कमाई केली होती. या चित्रपटांना पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ‘पती पत्नी और वो दो’ने मागले टाकले आहे.
‘पती पत्नी और वो दो’ या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत.

Pati Patni Aur Woh Do Collection Day 1 : दमदार ओपनिंगची अपेक्षा पण… आयुष्यमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले?
चित्रपटाची कथा आयुष्यमान खुराना (प्रजापती पांडे) या वनविभागातील प्रभारीभोवती फिरते, जो आपल्या पत्रकार पत्नीवर आणि तिची जवळची मैत्रीण निलोफर जी वनविभागातच काम करते, या दोघींवर खूप प्रेम करतो.
पण जेव्हा प्रजापतीचा जुना मित्र चंचलची एन्ट्री येतो, तेव्हा प्रजापतीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. यानंतर खोटेपणा, गैरसमज आणि मजेदार गोंधळाचा खेळ सुरू होतो, अशी सर्वसाधारण कथा चित्रपटाची आहे. यामुळे विकेंटला हा चित्रपट कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : Manoj Jarange : मनोज जरांगेंचे पुन्हा आमरण उपोषण! तारीखही केली जाहीर; काय आहेत मागण्या?





