Actress Kalyani Priyadarshan : लोका चॅप्टर १ चित्रपटातून लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन एका बॅालीवूड चित्रपटात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘प्रलय’ या हिंदी चित्रपटात अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिने प्रतिक्रिया दिली आहे. लोका चॅप्टर १ चित्रपटात अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई चित्रपटाने केली. चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. आता अभिनेत्री प्रलय चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन म्हणाली, मी नेहमीच म्हणत आले आहे की पटकथेच्या बाबतीत मी खूप लोभी अभिनेत्री आहे. जर चांगली पटकथा असेल, मग ती कोणत्याही भाषेत असो मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू किंवा मल्याळम मला ती हवी आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. त्यामुळे कल्याणीने हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे दिसत आहे. ‘लोका चॅप्टर १’ च्या यशानंतर हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स वाढल्या आहेत का असा प्रश्न कल्याणीला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ‘ऑफर्स वाढल्या आहेत की कमी झाल्या आहेत हे मी सांगू शकत नाही, पण संधी नेहमीच होत्या.’ लोका चॅप्टर १ हा मल्याळम भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे. २८ ऑगस्ट २०२५ रोजी हा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन डोमिनिक अरुण यांनी केले आहे आणि निर्मिती दुलकर सलमानने केली आहे. चित्रपटात नसलीन आणि सँडी यांच्यासह कल्याणी प्रियदर्शन, अरुण कुरियन, चंदू सलीमकुमार, निशांत सागर, रघुनाथ पालेरी, विजय राघवन, नित्या श्री आणि सारथ सभा या कलाकारांच्या भूमिका आहेत. हेही वाचा : क्रिती सॅननची बहीण नुपूरचा विवाह ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पडले पार; व्हिडिओ व्हायरल