भोर : भोर येथील गंगोत्री हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५२ नागरिकांनी रक्तदान करून नरेंद्र महाराज संस्थांनच्या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे भरत कुडले, चंद्रकांत शिवतरे आणि संदीप दाभाडे यांनी दिली. या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून भोर तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पांडुरंग पवार, चंद्रकांत शिवतरे, डॉ. राजेश धिवार, डॉ. अक्षय वाघमारे, राजेंद्र शेटे, संतोष केळकर, रघुनाथ वीर, दत्तात्रय कांबळे, संदीप दाभाडे, संपत कुडले, दीपक कुडले, सिद्धेश शिरगावकर, जयश्री शिरगावकर, सुजाता पवार, अर्चना मोहिते, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय हॉस्पिटल ब्लड सेंटरच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आयुष कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा सूर्यवंशी, अनुजा झेंडे, माधुरी फडतरे, सत्यजित नंदीमठ, अक्षय उरणकर, इशाद शेख, मधुकर नवलवार यांनी रक्त संकलनाचे काम केले.यावेळी या शिबिराविषयी अधिक माहिती देताना भरत कुठले म्हणाले, ४ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्ताच्या बाटल्या देण्याचा संकल्प संस्थांनने केला आहे. त्या अनुषंगाने आम्ही भोरमध्ये या शिबिराचे आयोजन केले असून ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून संस्थांनाला सहकार्य केले आहे. महाराष्ट्रात शिकलसेल, ऍनिमिया, हिमो फिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या फक्त पेढ्यांना आम्ही संकलित केलेले रक्त देण्याचा संकल्प संस्थांनच्या वतीने केला असल्याचे सांगून रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.