मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यात रक्तदान शिबीर

सविंदणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या आंबेगाव – शिरूर मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील ३९ गावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शिरूर तालुव्यातील मलठण, जांबुत या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच धामारी कारेगाव, कान्हूर मेसाई, पाबळ या गावांमध्येही आयोजन करणार असल्याचे व कोरोनाच्या संकटकाळी रक्ताचा तुडवडा येत असल्याने नागरीकांनी स्वंयस्फुर्तीने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आंबेगाव शिरूर शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी केले आहे.
त्या ठिकाणी ब्लड बँक पिंपरी-चिंचवड यांनी रक्त संकलित केले आहे. तसेच या गावांमध्ये माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या वतीने गरीब गरजूंना धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. सुमारे १२० युवकांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील ,जिल्हाप्रमुख माऊली कटके , आंबेगाव – शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार ,सरपंच प्रकाश गायकवाड, ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख ,ऊप तालुकाप्रमुख नवनाथ पोखरकर, धामारीचे सरपंच संपत कापरे, कान्हूर मेसाईचे सरपंच दादा खर्डे, कारेगावचे शरद नवले, अरुण कदम व शिवसैनिक, ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.





