हृदयात रक्ताची गुठळी; प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल

Prakash Ambedkar । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी पहाटे छातीदुखीच्या त्रासामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा हादरा मानला जात आहे.
Balasaheb Ambedkar was admitted to a hospital in Pune in the early hours of Thursday morning, October 31, for a chest pain.
Balasaheb Ambedkar is being treated at the ICU for a blood clot in his heart. 𝐇𝐢𝐬 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭 𝐜𝐨𝐧𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐢𝐬 𝐬𝐭𝐚𝐛𝐥𝐞 and 𝐡𝐞 𝐰𝐢𝐥𝐥…
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
मिळालेल्या माहितीनुसार,त्याच्या हृदयात रक्ताची गाठ झाली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. “बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते निरक्षणात राहणार आहे” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ‘एक्स’ या सोशल मीडियावरील अकाऊण्टद्वारे दिली आहे. तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा कारण ते या परिस्थितीला सामोरे जात आहेत अशी विनंती करण्यात आली आहे.
बाळासाहेबांना तुमच्या विचारांत ठेवा आणि ते लवकर बरे व्हावे ही प्रार्थना करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना पूर्वीही हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतला होता. अशात आता वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस VBA च्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.





