Black Leopard : ओडिशात आढळला काळा बिबट्या अर्थात ‘जॅग्वार’; जंगलात फिरताना दिसला

Black Leopard – ओडिशाच्या ( Odisha ) जंगलातील वन्यजीव प्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात वनविभागाच्या पथकाला नुकताच जंगलात दुर्मिळ प्रजातीचा काळा बिबट्या ( Black Leopard ) अर्थात जॅग्वार ( Jaguar ) फिरताना दिसला. राज्य सरकारच्या वतीने वाघ बचाव मोहिमेअंतर्गत वाघांची गणना करताना वनविभागाच्या पथकाने या जॅग्वारची छायाचित्रे घेतली आहेत.
त्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात ते लितात की, ओडिशात सुरू असलेल्या कॅमेरा ट्रॅप व्याघ्र गणनेमुळे आपल्या राज्यात वन्य प्राण्यांची काही रोमांचक आणि अनपेक्षित उपस्थिती दिसून येत आहे.
मात्र, नंदा यांनी जंगलाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. आणि ते योग्यच मानले जाते. अन्यथा शिकारी टोळ्या लगेच त्या भागाकडे कूच करतात. मध्य ओडिशाच्या जंगलातून काळा बिबट्या दिसल्याच्या बातम्या येत आहेत.
तो नयागड, कंधमाल, बौध आणि अंगुल जिल्ह्यातील जंगलात दिसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. काळ्या बिबट्याच्या दुर्मिळ प्रजातींच्या संख्येबाबत माहिती नसून, सरकारचा व्याघ्रगणनेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत जाहीर होणार आहे. अशा स्थितीत या अहवालातून त्याची संख्या अचूकपणे कळेल, अशी आशा वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.





