Raj Thackeray: “भाजपने रडीचा डाव खेळणं बंद करावं”; गोकुळच्या सत्तासंघर्षावरून राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray : भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष; राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray: ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तेत असलेल्या पक्षांनी डावपेच आखत शासकीय संचालक नेमल्याने यावर तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत.
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. महायुतीच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मुद्द्यावरून आणि सत्ता टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
बहुमत मिळवता आले नाही म्हणून सत्तेचा गैरवापर करून शासकीय संचालक नेमणे आणि लोकशाहीचा गळा आवळणे चुकीचे आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीला खडेबोल सुनावले आहे. भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
राज ठाकरेंची पोस्ट
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो.
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) November 6, 2026
बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ?
बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता.
गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! Raj Thackeray
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे. Raj Thackeray
हेही वाचा:
Newasa : गोधेगावात नरभक्षक बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांना दिलासा





