BJP News : राजकारणात मोठी खळबळ ! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि देशाच्या राजकारणात (BJP News) मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. दिल्लीत NEET परीक्षा पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळे केंद्र सरकार आणि भाजपवर चौफेर टीका होत आहे.

BJP News : गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि देशाच्या राजकारणात (BJP News) मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. दिल्लीत NEET परीक्षा पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळे केंद्र सरकार आणि भाजपवर चौफेर टीका होत आहे.
या घटनेचे पडसाद आता स्थानिक राजकारणातही उमटू लागले असून, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अमळनेर येथील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील भाजप (BJP News) शहराध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. श्याम पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना श्याम पाटील यांनी सांगितले की, दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसेने आणि लाठीचार्ज करून दडपण्याचा प्रयत्न झाला. तसेच पक्षाच्या विद्यमान धोरणांमुळे ते अत्यंत व्यथित आणि दुःखी झाले आहेत. माझ्यासाठी पद आणि प्रतिष्ठा महत्त्वाची नसून विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे हित सर्वोपरी आहे, असे सांगत त्यांनी लवकरच आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात NEET पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (BJP News) मागणी करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आंदोलन उभारले होते. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, आगामी काळात देशातील विविध भागांत जाऊन स्थानिक आणि जनहिताच्या मुद्द्यांवर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा या पक्षाकडून देण्यात आला असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता त्यांच्या पुढील आंदोलनांकडे लागले आहे.






