Narendra Modi : युवकांनी देशाचा मान वाढवला; मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून कौतुक
आपल्या तरुण पिढी विज्ञान क्षेत्रातही भारताचे नाव उज्ज्वल (Narendra Modi) करत आहेत. सायन्स ऑलिम्पियाड जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहेत, ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी भाग घेतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथचे ऑलिम्पियाड झाले.

Narendra Modi : आपल्या तरुण पिढी विज्ञान क्षेत्रातही भारताचे नाव उज्ज्वल (Narendra Modi) करत आहेत. सायन्स ऑलिम्पियाड जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहेत, ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी भाग घेतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथचे ऑलिम्पियाड झाले.
यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. देशातील अधिकाधिक तरुण अशा व्यासपीठांवर आपले कौशल्य सिद्ध करतील आणि जगभर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ च्या १३६ व्या भागाला संबोधित केले. त्यांनी सर्वप्रथम कारगिल विजय दिवसाचा उल्लेख करत वीर जवानांना नमन केले.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, गेल्या रविवारी विक्रम-१ चे यशस्वी प्रक्षेपण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण होता. आपण सर्वांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील हा ऐतिहासिक क्षण पाहिला. हे खासगी क्षेत्राद्वारे विकसित केलेले भारताचे पहिले रॉकेट आहे. आपल्या तरुण इनोव्हेटर्सनी ते करून दाखवले, जे कधीकाळी जवळजवळ अशक्य वाटत होते. त्यांनी आपले असाधारण कौशल्य, जिद्द आणि संयमाचे प्रदर्शन केले.
दुसरीकडे कारगिल विजय दिवस हा असा दिवस आहे, जो लक्षात ठेवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची आवश्यकता नाही. कारगिल युद्धात असंख्य आव्हानांना न जुमानता भारतीय सैनिकांनी हार मानली नाही आणि देशाला विजय मिळवून दिला. यावर्षी दिल्ली ते द्रास अशी विशेष शौर्य यात्रा आयोजित केली जात आहे.
याशिवाय यावर्षी आयएनएस महेंद्रगिरीला नौदलात सामील करण्यात आले आणि पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली असल्याचे सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी कॅच द रेन मोहिमेचाही उल्लेख केला.






