भाजप आमदार माधुरी मिसाळ करोना पॉझिटिव्ह

पुणे – राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करोना रुग्णांचा संख्येत अचानक वाढ झाली असून सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना काल करोनाची लागण झाली असल्याची बातमी ताजी असताना आज भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली असून मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.
— Madhuri Misal (@madhurimisal) December 30, 2021
सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून. मी सद्या होम आयसोलेशन मध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा. असे ट्वीट आमदार माधुरी मिसाळ यांनी केले आहे.





