BJP Leader : भाजपच्या लढवय्या नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यात सर्वत्र हळहळ
BJP Leader : भारतीय जनता पक्षाच्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ व लढवय्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई दत्तात्रय बुचके यांचे निधन झाले.

BJP Leader : भारतीय जनता पक्षाच्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ व लढवय्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई दत्तात्रय बुचके यांचे मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १३) पहाटे पाच वाजता निधन झाले. (BJP Leader)
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आशाताई बुचके यांची जुन्नर तालुक्यात आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि लढाऊ महिला नेत्या म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. (BJP Leader)
विविध सामाजिक प्रश्न तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने सक्रिय राहिल्या. आशाताई बुचके यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुमारे १५ वर्षे शिवसेनेत काम केले. त्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या माजी गटनेत्या म्हणूनही कार्यरत होत्या. जुन्नर तालुक्यात महिलांचे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. (BJP Leader)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय घडामोडींमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला. (BJP Leader)
त्या भाजप महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्य म्हणून तसेच पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. पुणे जिल्ह्यासह जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय कामाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क मजबूत केला होता. आशाताई बुचके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील आक्रमक आणि लढाऊ महिला नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (BJP Leader)
BJP Leader Pass Away : राजकीय वर्तुळात शोककळा ! भाजपच्या ‘या’ दिग्ग्ज नेत्याचे निधन
Bjp Leader Pass Away : भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा






