BJP Leader : भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन; वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने घेतला अखेरचा श्वास
BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ आदिवासी नेते नवनीतलाल निनामा यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले नवनीतलाल निनामा यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असलेल्या निनामा यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बांसवाडा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (BJP Leader)
जनसंघापासून भाजपपर्यंत संघटना उभी करण्यात निनामा यांचा मोठा वाटा होता. आणीबाणीच्या काळात (१९७६-७७) त्यांनी कारावासही भोगला होता. वागड प्रदेशाच्या विकासासाठी आणि आदिवासी हक्कांसाठी ते सातत्याने लढत राहिले. (BJP Leader)
निनामा यांनी १९७२ मध्ये जनसंघाकडून राजकारणात प्रवेश केला. १९८५ मध्ये भारतीय जनता पक्ष तर्फे घाटोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९०, २००३ आणि २०१३ अशा चार वेळा त्यांनी विधानसभा गाठली.
दीर्घ राजकीय कारकिर्द असूनही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. २०१८ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काही काळासाठी इतर पक्षात प्रवेश केला, मात्र नंतर पुन्हा भाजपमध्ये परतले. (BJP Leader)
त्यांच्या निधनानंतर भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, “राजकारणातील एका युगाचा अंत झाला,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा :
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मोठी घोषणा ! थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केला जाहीर




