भाजपनेही नेत्यांच्या मुला-मुलींना दिली तिकिटे: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, सीएम सैनी यांनाही तिकीट

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांची जागा बदलण्यात आली आहे. सैनी आता कर्नालऐवजी कुरुक्षेत्रच्या लाडवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ज्ञानचंद गुप्ता पंचकुलामधून, अनिल विज अंबाला कँटमधून, कंवर पाल गुर्जर जगाधरीतून, माजी खासदार सुनीता दुग्गल रतियामधून, कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई आदमपूरमधून, तेजपाल तन्वर सोहनामधून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत लाडवामधून काँग्रेस विजयी झाली होती.
भाजपनेही नेत्यांच्या मुला-मुलींना तिकिटे दिली –
भाजपने आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या मुला-मुलींनाही तिकीट दिले आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांची मुलगी आरती राव यांना अटेलीतून तिकीट मिळाले आहे. तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांना तोशाममधून तिकीट देण्यात आले आहे. किरण चौधरी हे येथून सातत्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य याला आदमपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP releases its first list of 67 candidates for the upcoming Haryana Assembly elections.
CM Nayab Singh Saini to contest from Ladwa, Gian Chand Gupta from Panchkula, Anil Vij from Ambala Cantt., Kanwar Pal Gurjar from Jagadhri, Sunita Duggal from Ratia, Bhavya Bishnoi from… pic.twitter.com/iBvdwdabLX
— ANI (@ANI) September 4, 2024
माजी खासदार अरविंद शर्मा यांनाही तिकीट मिळाले –
असीम गोयल यांना अंबाला कँटमधून तर सुभाष सुधा यांना ठाणेसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री महिलापाल धांडा यांना पानिपत ग्रामीण मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. त्याचवेळी भाजपने पानिपत शहरातून प्रमोद विज यांना उमेदवारी दिली आहे. गोहानामधून माजी खासदार डॉ.अरविंद शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. शीशपाल कंबोज यांना रानियामधून तिकीट मिळाले आहे. कॅबिनेट मंत्री रणजित सिंह चौटाला हे येथून आमदार होते. भाजपने त्यांना तिकीट दिलेले नाही. चौटाला यांना हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.
जेजेपीच्या आमदारांना तिकीट –
जेजेपीमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले देवेंद्र सिंग बबली यांनाही त्यांच्या टोहाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामकुमार गौतम यांना सफिंदो येथून तिकीट मिळाले आहे. तर अनूप झनक यांना उकलाना येथून तिकीट मिळाले आहे.
या ज्येष्ठ नेत्यांना भाजपने तिकीट दिले –
त्याचवेळी भाजपने आपले ज्येष्ठ नेते कॅप्टन अभिमन्यू यांना नारनौदमधून, तर ओमप्रकाश धनखर यांना बादलीमधून तिकीट दिले आहे. राव नरबीर सिंग यांना बादशाहपूरमधून तिकीट मिळाले आहे. बल्लभगडमधून मूलचंद्र शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. जगमोहन आनंद यांना कर्नालमधून उमेदवारी देण्यात आली आहे.





