शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दौंडमध्ये भाजपाची ‘ट्रॅक्टर रॅली’
Updated On:

दौंड – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी बळीराजा सन्मान आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन भाजपा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.
यावेळी चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, सरचिटणीस वासुदेव काळे, आमदार सुजितसिंह ठाकुर, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे यांसह मान्यवर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.





