Tejasvee Ghosalkar : भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचं थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र; ‘जेन झी’साठी ‘ही’ मोठी मागणी
Tejasvee Ghosalkar : या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र धाडलं असून मोठी मागणी केली आहे.

Tejasvee Ghosalkar : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलकडे पाहिले जाते. दररोज हजारोंच्या संख्येने लोकलने मुंबईकर प्रवास करतात. लोकलच्या रेल्वे डब्यातील गर्दी अंगावर काटा आणणारी असते. यामुळे ही बाब प्रवास करणाऱ्यांसाठी मोठ्या अडचणीची ठरते. लोकलने मोठ्या प्रमाणावर कॅालेज तरुण-तरुणी देखील प्रवास करतात. यामध्ये ‘झेन झीं’ची संख्या लक्ष्यणीय आहे. त्यांनाही लोकलने प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र धाडलं असून मोठी मागणी केली आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीच्या तरुणांसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनमधील १२ पैकी तीन डबे राखीव करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहले आहे. या पत्रात तेजस्वी घोसाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेनचे तीन डबे आरक्षित करण्यात यावे, असे म्हटले आहे. पहाटे ५ ते सकाळी ११ यावेळेत विद्यार्थ्यांसाठी तीन डबे आरक्षित करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे.
मात्र, मुंबई लोकलमधील दोन डबे महिलांसाठी राखीव असून, त्याशिवाय एक प्रथम श्रेणीचा आणि एक मालवाहतूक करणाऱ्यांसाठीचा डबा आरक्षित असतो. त्यामुळे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत उर्वरित डब्यांवर प्रचंड ताण येतो आणि प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी आणखी तीन डबे राखीव करण्याची मागणी कितपत व्यवहार्य ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी केलेल्या या मागणीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) गांभीर्याने विचार करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक २ च्या नगरसेविका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना या वॅार्डमध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. भाजपने दाखवलेला विश्वास तेजस्वी घोसाळकर यांनी सार्थ ठरवत मोठ्या मताधिक्क्याने निवडणुकीत विजय मिळवला.
Donald Trump US Iran War: “प्रत्येक जीवाची भरपाई द्या, अन्यथा…” ; तेहरानला ट्रम्प यांचा थेट इशारा





