भाजपने हरियाणा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींसह 40 नेत्यांची नावे

चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर यांच्यासह 40 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
हे बडे नेते प्रचार करणार –
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर नेतेही प्रचारासाठी हरियाणामध्ये येणार आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजप उमेदवारांना मते मागण्यासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंग, कृष्णपाल गुर्जर, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी –
पंप्रधान नरेंद्र मोदी, जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, नायबसिंग सैनी, मोहनलाल बडोली, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, सतीश पुनिया, बिप्लब कुमार देब, सुरेंद्रसिंग नगर, पियुष गोयल,अर्जुन राम मेघवाल, हरदीप सिंग पुरी, डाॅ. सुधा यादव, भजनलाल शर्मा, डॉ. मोहन यादव, पुष्कर सिंग धामी, हिमंता बिस्वा सरमा, राव इंद्रजित सिंग,कृष्णपाल गुर्जर, वसुंधरा राजे सिंधिया, स्मृती इराणी,जयराम ठाकूर, रवनीत सिंग बिट्टू, अनुराग ठाकूर, दिया कुमारी, हेमा मालिनी, किरण चौधरी, धरमबीर सिंग, नवीन जिंदाल, अशोक तंवर, मनोज तिवारी, डॉ संजीव बल्यान, कुलदीप बिश्नोई, राम चंदर जांगरा, बबिता फोगट यांच्या नावाचा समावेश आहे.





