Pune District : भाजपा आळंदी शहर मंडलाचा ‘सेवा यज्ञ महा रक्तदान संकल्प’
Pune District : गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आळंदी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या आळंदी शहर मंडलाच्या वतीने आळंदी देवाची येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘सेवा यज्ञ महा रक्तदान संकल्प’ या उपक्रमांतर्गत आयोजित शिबिराला नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
‘रक्तदानातून शुभेच्छा देऊया’ हा संदेश देत वाढदिवसाचे औचित्य साधून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिराला भाजपा आळंदी शहर मंडलाच्या अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा वैजयंती अशोक उमरगेकर यांच्यासह नगरसेवक दिनेश घुले, रामदास आबा भोसले, सोमनाथ कुर्हाडे, नगरसेवक तथा युवा मोर्चा अध्यक्ष सुनील घुंडरे, ज्ञानेश्वर रायकर, श्रीधर कुर्हाडे, भाजपा आळंदी शहर मंडलाचे सरचिटणीस संजय दादा घुंडरे तसेच अॅड. आकाश राजेंद्र जोशी उपस्थित होते. यावेळी हिमांशू दळवी, ज्ञानेश्वर बनसोडे, माऊली गलबे, अनिल वाघमारे, प्रीतम किरवे, अभिषेक उमरगेकर, अशोकराव उमरगेकर, पाटील गवारी, चारुदत्त प्रसादे, श्याम कोलन, बालाजी कांबळे, आनंद दिवाकर आणि मनोहर दिवाने यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
रक्तदान करणार्या सर्व रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदात्यांसाठी फळे, दूध, बिस्किटे आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरादरम्यान रक्तदाते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला.





