Pimpri : माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांना वाढदिवसनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

तळेगाव दाभाडे : राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना वाढदिवसनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या निवास्थानी मावळ तालुक्यासह जिल्ह्यामधून जनसागर लोटला. तसेच तालुक्यामधून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडास्पर्धाव्दारे भेगडे यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी भेगडे यांनी वाढदिवसानिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर देहू या ठिकाणी अभिषेक व महापूजा केली. तसेच श्री क्षेत्र भंडारा डोंगर, तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल मंदिर व डोळसनाथ मंदिर या ठिकाणी दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या निवास्थानी आगमन झाले. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने फोनव्दारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार भीमराव तापकीर तसेच तालुक्यातील विविध राजकीय प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रीम इंडस्ट्री उर्से यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच कामशेत या ठिकाणी कामशेत शहर भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. चिंचोली या ठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन नगरसेवक राहुल बालघरे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
मावळ तालुक्याचे माजी उपसभापती शांताराम कदम यांच्या वतीने आंबी येथील केरिंगहॅन्ड या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व अनाथ आश्रमात आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. अश्या प्रकारे अनेक सामाजिक कार्यक्रमातून उत्साहाने वाढदिवस संपन्न झाला.





