पुणे : स्वानंद प्राथमिक विद्यालय, धायरी येथे ‘जननायक बिरसा मुंडा ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ‘जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या डॉ. संजीवनी पाटकर (बालगोकुलम सिंहगड भाग प्रचारक), माधवी खाडे (वन वासी कल्याण आश्रम पुणे महानगरः महिला कार्यकर्त्या) संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विलास नऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० जयंतीचे औचित्य साधत इ .२ री चा विद्यार्थी श्रीवत्स अग्निहोत्री याने भाषण केले. इ.३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. इ. ५ वी च्या श्रेयश जंगम व वेदांत माने यांनी गीत व चारोळी, इ.४ थी च्या युगांत चोभू व श्रीवेद जाधव यांनी गीतगायन केले. इ. ७ वी रविराज बिरादार याने जननायक बिरसा मुंडा यांची व्यक्तीरेखा साकारली. स्वानंद विद्यालयात जननायक बिरसा मुंडा सप्ताहाचे आयोजन केले, यात विद्यार्थ्यांनी ‘चित्रकला, निबंध, प्रतिकृती तयार करणे यात सहभाग नोंदवला. डॉ. संजीवनी पाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जननायक बिरसा मुंडा यांचा जीवनपट सांगितला, त्यांच्या कार्याची माहिती दिली, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित असणा-या प्रत्येकाला एक शपथ घेण्यास सांगितले. आपल्याबरोबरच सोबत असणा-यांची काळजी घ्या. परिसर स्वच्छ ठेवा. प्रामाणिकपणे अभ्यास करा, अशा विविध गोष्टी सांगत असतानाच एकमेकांना सहकार्य करा, अन्यायाला प्रतिकार करा हे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अवंती देशपांडे यांनी मानले.