World Billiards Championship 2024 : “अद्भुत कामगिरी…” पंतप्रधान मोदींकडून विश्वविजेत्या पंकज अडवाणीचे कौतुक….

World Billiards Champion 2024 (Pankaj Advani) :- जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत ऐतिहासिक 28 वे विजेतेपद पटकाविल्याबद्दल भारताचा खेळाडू पंकज अडवाणीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंकज अडवाणीने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलला 4-2 असे पराभूत करताना विजेतेपदावर मोहोर लावली.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून लिहिलेल्या पोस्टमध्ये, ही एक अद्भुत कामगीरी असून तुमचे अभिनंदन, तुमची वचनबद्धता, समर्पण हे उत्कृष्ट असल्याचे तुम्ही वारंवार दाखवून दिले आहे. तुमचे यश आगामी खेळाडूंना प्रेरणा देणारे असेल, असे म्हटले आहे.
Phenomenal accomplishment! Congratulations to you. Your dedication, passion and commitment are outstanding. You have time and again demonstrated what excellence is. Your success will also keep inspiring upcoming athletes.@PankajAdvani247 https://t.co/VIDTedsR7b
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2024
पंकज अडवाणीने 2016 मध्ये पहिले जगज्जेतेपद मिळविले होते. कोरोना काळात 2020 व 2021 साली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. आजच्या सामन्यात पंकज आडवाणीने 151-94, 151-0, 150-84, 74-151, 6-154, 152-46 असा विजय मिळविला. सलग सातव्यांदा हे विजेतेपद पटकावण्यात पंकजला यश आले आहे.
विजयानंतर पंकज अडवाणी म्हणाले की, जागतिक बिलियर्ड्सचे विजेतेपद पुन्हा पुन्हा जिंकून चांगले वाटते. मात्र, ही स्पर्धा सोपी नव्हती. स्पर्धा बरीच चुरशीची होती.





