China Open 2024 : गॉफने पटकावले विजेतेपद, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी अमेरिकन खेळाडू….

China Open 2024 (Karolina Muchova vs Coco Gauff) :- अमेरिकेच्या कोको गॉफने रविवारी बीजिंग येथे महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत चायना ओपनचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या या अमेरिकन खेळाडूने अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या 28 वर्षीय कॅरोलिना मुचोवाचा 6-1, 6-3 असा पराभव केला. कोको गॉफने एक तास 17 मिनिटांत सामना जिंकला.
वीस वर्षीय कोको गॉफ गेल्या 14 वर्षात हे विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण खेळाडू तर ठरली आहेच, पण सेरेना विल्यम्स (2004 आणि 2013) नंतर येथे चॅम्पियन बनणारी दुसरी अमेरिकन खेळाडू देखील ठरली आहे. कोको गॉफचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे आणि कारकिर्दीतील हे 8 वे विजेतेपद आहे. या मोसमाच्या सुरुवातीला तिने ऑकलंडमधील एएसबी क्लासिक विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला होता.
China Open 2024 : अल्काराजनं पटकावलं जेतेपद, गतविजेत्या सिनरला चारली पराभवाची धूळ…
दरम्यान, याआधी अमेरिकेच्या कोको गॉफने स्पेनच्या पॉला बाडोसाला तर चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाने चीनच्या झेंग क्विनवेनला पराभूत करताना चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.





