Pune: नायलॉन मांजाने दुचाकीस्वार जेष्ठाचा गाल चिरला

पुणे – दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाला मांजा कापल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर घडली आहे. यामुळे त्यांच्या गालाला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. देवराम दत्तात्रय कामठे ( ६७ रा. पुरंदर, सध्या शिवाजीनगर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
नाशिकमध्ये एकाचा मृत्यू, छ.संभाजीनगरमध्ये पीएसआयचा गळा चिरला –
नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाचा गळा चिरून करुण अंत झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात दुचाकीवरून ड्युटीवर निघालेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गळ्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुचाकीवरून जात असलेली महिला नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाली. नाशिकमधील कन्नमवार पूल परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ सोमवारी (ता. ६) ही घटना घडली. पतीच्या वेळेत लक्षात आल्याने हानी टळली. दरम्यान, वापरकर्त्यांच्या मागणीमुळे चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री होत आहे. अशा वापरकर्त्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.




