#BiharWACT2024 : भारताची उपांत्य फेरीत धडक, ऑलिम्पिक पदक विजेत्या चीनला चारली पराभवाची धूळ….

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 :- भारताच्या स्टार स्ट्रायकर संगीता कुमारी व दीपिका यांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चीनला 3-0 असे पराभूत करताना महिला आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
Full-Time! 🇮🇳🏑
Team India extends their dominance at the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024, defeating China 3-0 with a sensational display of skill and teamwork! 🔥💪
The defending champions are on fire, climbing to the top of the table and securing their place… pic.twitter.com/zx5DJPbvQx
— Hockey India (@TheHockeyIndia) November 16, 2024
मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी अनेकदा गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गोलशून्य बरोबरी केली होती. मध्यांतरानंतर मात्र भारताने आपला पावित्रा बदलला.
मध्यंतरानंतर भारताने संघात बदल केले, आणि त्याबरोबरच 32 व्या मिनिटाला मिडफिल्डर सुशीला चानूने भारताची स्ट्रायकर संगीता कुमारीकडे पास सोपविला व संगीता कुमारीने चेंडूला थेट गोलपोस्टमध्ये ढकलले. यानंतर केवळ 5 मिनिटांच्या अंतराने भारताची ब्युटी डुंगडुंग व प्रीती दुबे यांनी सुरेख चाल रचताना चेंडू कर्णधार सलिमा टेटेकडे सोपविला व कर्णधार सलिमाने चीनच्या गोलरक्षकाला चकवले, आणि चेंडू गोलपोस्टमध्ये स्थिरावला.
संगीता कुमारी व सलिमा टेटे यांच्या मैदानी गोलमुळे चीनचा संघ गडबडला. त्यानंतर मात्र चीनी खेळाडूंनी समन्वय राखण्याचा प्रयत्न केला.संगीताने स्टिकची करामत करताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला आणि स्ट्रायकर दिपीकाने चेंडूला थेट गोलपोस्टमध्ये घडताना स्पर्धेतील 7 व्या गोलची नोंद केली.
#BiharWACT2024 : भारतीय संघाची विजयी हॅट्ट्रिक; थायलंडचा 13-0 नं उडवला धुव्वा…
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आलेल्या चीनविरुद्धचा विजय हा स्पर्धेतील भारताचा सलग चौथा विजय आहे. या विजयाने भारत आता स्पर्धेच्या क्रमवारीत 8 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. चीनने चार लढतीतून 6 गुणांची कमाई करताना दुसरे स्थान राखले आहे. शेवटच्या साखळी सामन्यात भारतासमोर जपान संघाचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेतून अव्वल चार संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. दिवसातील इतर सामन्यांमध्ये जपानने मलेशियाचा 2-1 असा तर कोरियाने थायलंडचा 4-0 असा पराभव केला.





