Bigg Boss Marathi 5: शेवटी आलो, शेवटी जाणार..! सूरज म्हणतोय,”ट्रॉफी मीच जिंकणार”

Bigg Boss Marathi 5 । suraj chavan: टिक टॉकच्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत ‘सूरज चव्हाण’. महाराष्ट्रात सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवतानाही दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी’चं घर, तिथले सदस्य, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी सुरुवातीला सूरजसाठी खूप नव्या होत्या. त्यामुळे सुरुवातीचा एक आठवडा तो शांत होता. पण आता दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रभर त्याचा चांगलाच बोलबाला आहे.
सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’चा खेळ त्याच्या गोलीगत स्टाईलने खेळत आहे. आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजीतला सांगणार आहे,”बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी मीच नेणार”. त्यावर अभिजीत त्याला म्हणतो,”तुझा हक्क आहे”.
सूरज म्हणतो,”बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही”. अभिजीत सूरजला म्हणतो,”शेवटून पहिला आहेस तू”. त्यावर सूरज म्हणतो,”शेवटी आलो… शेवटीच जाणार”. यावर अभिजीत म्हणतो,”तू जिंकलास तर आम्हालाही आनंद होईल”.
दरम्यान सध्या, गोलीगत सूरज चव्हाण त्याच्या स्टाईलने खेळून ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचा खेळीचं सर्वत्र चांगलच कौतुक होत आहे.





