राहुल गांधींना आणि काॅंग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनींचा मुलगा भाजपात दाखल

नवी दिल्ली – राहुल गांधी आणि कॉंग्रेसला धक्का देणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनीने आज भाजप स्थापनादिनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला आहे. मागच्या महिन्यात त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम केला होता.
बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच, या प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट डिलीट करण्याचा दबावही त्यांच्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे अनिल अँटोनी यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.
अनिल के अँटोनी यांनी आतापर्यंत केरळ कॉंग्रेस कार्यकारणीचे डिजीटल कम्युनिकेशन हाताळले आहे. केरळमधील कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी एक निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये झालेल्या दंगलीवर बीबीसीने तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्याची घोषणा केरळ कॉंग्रेसटच्या विविध शाखांनी केली. यावरुन अनिल अँटोनी यांनी विरोधी प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, बीबीसी डॉक्युमेंटरीच्या विरोधी आणि भाजपाला पाठिशी घालणारे ट्वीट डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचे कारण देत अनिल के अँटोनी यांनी कॉंग्रेसमधील सदस्य पदांचा राजीनामा दिला होता.





