Nilesh Rane : “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं”; निलेश राणेंचा इशारा
Nilesh Rane : निलेश राणे यांचे नवनाथ बन यांना प्रत्युत्तर

Nilesh Rane : राज्यातील पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. ज्यात महाविकास आघाडीने पदवीधरच्या तिन्ही जागा जिंकल्या तर सत्ताधारी महायुतीने शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागा जिंकल्या.
या निवडणुकीत पाचपैकी केवळ 2 जागा मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत वाद समोर आले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. त्यावर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांना प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती, असे निलेश राणे यांनी म्हटले.
नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं.
तुझी लायकी किती तू बोलतो किती.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2026
दरम्यान, पुण्यासह नागपूरमध्ये भाजपाला धक्का बसला. विधान परिषदेच्या या निवडणुकीमुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. भाजपाचे नेते जाहीरपणे शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. रवींद्र धंगेकर यांनीही जोरदार समाचार घेतला.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना नेत्याने निलेश राणे जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा:
Sai Pallavi: ‘रावण पूर्णपणे वाईट नव्हता’; साई पल्लवीच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ





