मोठी बातमी.! उद्या होणार आफताबची सुटका? कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २६ वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी त्याचवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता.
मात्र, या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी माहिती समोर येत असून, यामुळे सर्वांच्याच भुवया उंचगावल्या आहेत. सध्या आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली असून तो सध्या तिहारच्या कोठडीत आहे.
अशातच, आज आफताबने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेच १७ डिसेंबर रोजी म्हणजेच, उद्या सुनावणी होणार आहे. मात्र आफातबला जामीन मिळणे अशक्य असल्याचं बोललं जात आहे. कारण कालच पोलिसांना आफतोबविरोधात एक भक्कम पुरावा हाती लागला आहे.
Shraddha murder case | Accused Aftab Poonawala has moved an application in Delhi’s Saket Court seeking bail in the matter. He is in judicial custody after police interrogation. His bail plea will be heard tomorrow.
— ANI (@ANI) December 16, 2022
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब पुनावालाने जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रकरणाला आणखी गती मिळाल्याचं दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती.
त्याशिवाय, आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते.
दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आफताब पुनावाला याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आणि अश्यातच त्याने जामीन मिळावा यासाठी अर्ज देखील केला आहे. त्यामुळे आता उद्या आफताब पूनावाला याला जमीन मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





