Govind Pansare Murder Case | कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज (दि. 20 जानेवारी) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पहाटेच्या सुमारास उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पानसरे हत्या प्रकरण नेमके काय? ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि सामाजिक कार्यकर्ते हे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकहून परतत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे देखील जखमी झाल्या होत्या. Govind Pansare Murder Case | उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना एसआयटीनं अटक केली होती. मात्र, एसआयटीच्या तपासावर पानसरे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर 2022 मध्ये उच्च न्यायालयानं हा तपास एटीएसकडे सोपविला होता. Govind Pansare Murder Case | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयानं दहा संशयितांवर हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले होते. यामध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर, भरत कुरणे यांचा समावेश होता. या हत्या प्रकरणातील सर्वच 12 संशयीतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. हेही वाचा: राजकारण तापलंं! प्रणिती शिंदेंवर टीका करताना भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान म्हणाले “50 कदम…”