पुणे – प्रसिद्ध टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे.
वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा