Birendra Saraf : मोठी बातमी! राज्याच्या महाधिवक्तांचा अचानक राजीनामा: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली माहिती

Birendra Saraf : एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी 16 सप्टेंबर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजू मांडण्यांची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी सराफ यांच्यावर होती. पण त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सराफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुढील व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांनी त्यांना काम पाहण्याची विनंती केली होती. त्यामुळे सराफ आता जानेवारी महिन्यापर्यंत काम पाहणार आहेत. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.





